सुस्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव....! या ब्लॉगवरील माहिती अपडेट करणे चालू आहे.

Sunday, 4 October 2020

*🔸महात्मा गांधी.🔸*




      गांधी जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा

       *🔸महात्मा गांधी.🔸*

 *मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.*

 

*असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. इ.स. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधी आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करणे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ.स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.*

 

*गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.*

 

*गांधींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या तीन पत्नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. आईमुळे मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वाङ्मयातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासचा मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात की या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता. ते लिहितात "त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंन्द्रासारखा वागलो असेन" गांधीच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणाशी झालेल्या स्व:ओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो.*

 

*इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा (आणि प्रेमाने बा) असे घेतले जाई. पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या. या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या दिवसाच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते, "आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमचासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाइकांबरोबर खेळणे" हेच होते. इ.स. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- इ.स. १८८८ मध्ये हरीलाल, इ.स. १८९२ मध्ये मणिलाल, इ.स. १८९७ मध्ये रामदास आणि इ.स. १९०० मध्ये देवदास.*

 

*त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढीलप्रमाणे होता - "इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठीक आणि भूगोलात कच्चा. वर्तणूक अतिशय चांगली, हस्ताक्षर खराब " ते मॅट्रिकची परीक्षा भावनगरमधील शामळदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असतांना, त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेबद्दल ते नाखूश होते.*

 

*बॅरिस्टर.*

*शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही. आणि लंडनमधील त्याकाळी दुर्मीळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहिले. गांधींनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तीना गांधी भेटले, त्यातील काही स्त्रिया थिओसोफ़िकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांनी गांधीना आपल्यात येऊन मिळण्यासाठी आणि भाषांतरित आणि मूळ भगवद्गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. आधी धार्मिक गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले.*

 

*इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले. १८९१ मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले. भारतात आल्यावर कळले की त्यांच्या आईचा ते लंडनमध्ये असतानाच देहान्त झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते. खटल्यांसाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. १८९३ मध्ये त्यानी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ (दक्षिण आफ्रिका) येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला.*

 

*दक्षिण आफ्रिका.*

*गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे नेतृत्व असणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरमिट्यानी(?) गांधीना नोकरी दिली. 'भारतीयत्व' सर्व धर्म आणि जातींमध्ये उतरले आहे असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधीनी या सर्वाना भारतीयच मानले. मुख्यत्वे धर्माच्या बाबतीत ऐतिहासिक भिन्नता आपण सांधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता, आणि हा विश्वास घेऊन ते भारतात आले. येथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला.*

 

*दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकालांगाची ओळख झाली. भारतीय धर्म आणि संस्कृती यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले.*

 

*दक्षिण आफ्रिकेत गांधीना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले, तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकिट असतांनासुद्धा त्यांना पीटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना अपमान करून आगगाडीमधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली. (७ जून १८९३). गांधीनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणाऱ्या त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडवू शकले असते. पण सूडभावनेने कोणाला शिक्षा करविणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता.*

 

*पुढे एकदा, प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे, डर्बनमध्ये न्यायाधीशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याऱ्या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली.*

 

*तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता, या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले, तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी इ.स. १८९४ मध्ये नाताळ भारतीय कॉंग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. इ.स. १८९७ मध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर दरबानमध्ये उतरत असताना काही गोऱ्या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि केवळ पोलीस अधीक्षकाच्या पत्नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दात तुटले. पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते.*

 

*इ.स. १९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये, त्या वर्षीच्या ११ सप्टेंबर ला, गांधींनी, पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या असलेल्या सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. तेथील समुदायाने या आवाहनाला साद दिली आणि आगामी सात वर्षात हजारो भारतीयांनी हरताळ केल्यामुळे, नोंदणी करण्यास नकार दिल्यामुळे, नोंदणी पत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील झाल्यामुळे लोकांनी तुरुंगवास भोगला, चाबकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोळ्याही खाल्या. सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरीत्या मोडून काढला तरी पण या अहिंसक चळवळीची व लोकक्षोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्त्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्तिआन स्मट्स याला भाग पडले. शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता. गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षादरम्यान परिपक्व झाली.*

 

*१९०६ मध्ये इंग्रजांनी नाताळमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करवून घेण्यासाठी गांधीनी इंग्रजांना प्रोत्साहित केले. भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाच्या दाव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांच्या पाठिंबा देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यानी केला. ब्रिटिशानी गांधींची ही मागणी मान्य केली. आणि २० जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती. दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले. या अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या मिलिटरी ताकदीस उघड उघड आवाहन देणे निराशाजनक आहे - त्यानी ठरवून टाकले की याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अश्या अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल. नंतर जेव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेव्हा गांधीना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकांत घोषित करण्यात आले.*

 

*स्वातंत्र्यसंग्राम.*

*इ.स. १९१५मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.*

 

*गांधीनी १९२० मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर मागण्यांमध्ये सतत वाढ करत करत (काही ठिकाणी थांबत आणि तडजोड करत) २६ जानेवारी १९३० कॉंग्रेसने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले. अधिकाधिक वाटाघाटी होत गेल्या आणि कॉंग्रेसने १९३०मध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊ पर्यंत ब्रिटिशांना हे ओळखता आले नाही. १९३९च्या सप्टेंबर मध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता व्हाईसरॉयने जेव्हा जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले तेंव्हा गांधीनी आणि कॉंग्रेसने ब्रिटिश सरकारचा पाठिंबा काढून घेतला. गांधीनी १९४२मध्ये तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत आणि ब्रिटिश सरकारने प्रतिसाद म्हणून त्यांना आणि लाखो कॉंग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबेपर्यंत तणाव वाढतच गेला. दरम्यान मुस्लीम लीगने ब्रिटन ला सहकार्य केले, आणि गांधींच्या तीव्र विरोधाला डावलून मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची, पाकिस्तानची मागणी केली. १९४७ मध्ये ब्रिटिशानी भूमीची फाळणी केली आणि गांधीनी अमान्य केलेल्या शर्तींवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले.*

 

*३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.[१७] त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले:*

 

*"माझ्या मित्र आणि सहकाऱ्यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ म्हणत असू, आता आपल्यामध्ये नाही आहेत. कदाचित तसे म्हणणे चूकच ठरेल, पण आपण त्यांना आता बघू शकणार नाहीत, जसे आपण त्यांना इतके वर्ष बघत आलो आहोत. (संकटांमध्ये) त्यांचा सल्ला घ्यायला आपण आता धावत जाऊ शकणार नाही. त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यवधी लोकांसाठीसुद्धा."*

 

*गांधीजींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या. जवळपास सर्व अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ ला अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले. पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. १९९७ मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बॅंकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. ३० जानेवारीला त्यांच्या परिवाराने अजून एका रक्षापात्राचे विसर्जन मुंबईत गिरगाव चौपाटीवर केले. हे पात्र एका दुबईमधील व्यापाऱ्याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते. अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे (जिथे गांधीजी १९४२ आणि १९४४ च्या दरम्यान बंदिवासात होते) आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे. त्यांच्या परिवाराला जाणीव आहे की तेथील अस्थी राजकीय फायद्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पण ते पात्र तिथून काढून घेतल्यास तो मठ बंद पडेल या भीतीने गांधीजींचे वंशज ते रक्षापात्र तिथून काढून घेऊ इच्छित नाहीत.*

*स्त्रोत: विकिपीडिया.*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄






                                                                  






सोमेश्वर रमेश भगवान. ( प्राथमिक शिक्षक ) 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कुसगाव. ता.भोर, जि. पुणे.
 412205 मोबाईल क्रमांक - 9823263384

Sunday, 7 June 2020

Online Result 2019-20 (STD 3 rd)

 इयत्ता तिसरीचा निकाल
 सन 2019-20
 पाहण्यासाठी 
  खालाल लिंकवर क्लिक करा.


 
स्मार्ट PDF फाईल ओपन झाल्यानंतर  
आपल्या मुलाच्या नावापुढे क्लिक करुन
 निकाल डाउनलोड करा.

Saturday, 6 June 2020

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

                                                        
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
६ जून १६७४


                छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.

दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
👁️ शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून…..
 
हेन्री ऑक्सएन्डन (HENRY OXENDEN)च्या डायरीतील माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. या हेन्री ने राज्याभिषेक सोहळा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वर्णनात्मक माहिती आपल्या डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

हेन्री ने असे नमूद केले आहे कि, राज्याभिषेक सोहळा हा दिनांक ३० मे १६७४ रोजी सुरु केला गेला आणि दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला. या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.

🚩 ३० मे १६७४: हेन्री, जेधे शकावली, शिवापूर शकावली आणि समकालीन साधनांत नमूद केले आहे कि, या दिवशी हा सोहळा रायगडावर सुरु झाला. दिनांक ३० मे १६७४ रोजी शिवरायांनी वैदिक पद्धतीनुसार आपल्या सर्व राण्यांशी पुन्हा विवाह केला (ज्या राण्या हयात होत्या त्यांच्याशीच). सोबतच शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे गणेश पूजन तसेच पुण्यावाचन असे विधिवत कार्य संपन्न झाले.

🚩 ३१ मे १६७४: या दिवशी ऐंद्रीशांती विधी आणि ऐशानयाग असे विधी पार पडले.
 
🚩 १ जून १६७४: या दिवशी रायगडावर ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम असे विधी करण्यात आले.

🚩 २ जून १६७४: २ जून १६७४ म्हणजेच हिंदू कालगणनेप्रमाणे मंगळवार, ज्येष्ठ शुद्ध नवमी असा दिवस होता आणि शिवराज्याभिषेक प्रयोगात नमूद केल्याप्रमाणे या दिवशी राज्याभिषेकाशी संबंधित कोणतेही विधी करणे योग्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही विधी-संस्कार झाले नाहीत.

🚩 ३ जून १६७४: शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे या दिवशी नक्षत्रयज्ञ संपन्न झाला.

🚩 ४ जून १६७४: निवृत्तीयाग हा विधी या दिवशी करण्यात आला.

🚩🤴🏻 ५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)

दिनांक ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे भोसले यांचा स्वराज्याचे राजे म्हणून, सोयराराणी साहेब यांचा स्वराज्याच्या महाराणी आणि संभाजी भोसले यांचा स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. अनेक सुवासिनींनी त्यांना ओवाळले, अनेक उदकांनी पती-पत्नी दोघांवर अभिसिंचन केले गेले आणि पुन्हा एकदा महाराजांनी स्नान संपन्न केले, वस्त्रालंकार केला आणि धनुर्धारणा करून शिवराय रथारोहणासाठी सज्ज झाले आणि नंतर हत्तीवर बसून त्यांनी मंदिरालाही भेट दिली.

हे सगळे सोहळे, विधी, संस्कार संपन्न झाल्यावर अखेर दिनांक ६ जून १६७४ पहाटे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ सूर्योदयाच्या ३ घटिका पूर्व शिवाजी महाराज, सोयराराणी साहेब आणि शंभूराजे आपल्या सिंहासनावर आरूढ झाले. संपूर्ण दरबार शिवरायांना वाकून सलाम आणि नजराणे देत होते आणि सर्वांचा उर अभिमानाने भरून आला होता, डोळ्यांतील अश्रूंमुळे सर्वांच्या डोळ्यापुढील दृश्ये पुसट झाली होती. इतिहासातील एक अभूतपूर्व सोनेरी सोहळा संपन्न झाला होता आणि जिजाऊंच्या छायेत वाढलेला, मावळ्यांमध्ये मस्ती करून, खेळ खेळून स्वराज्याची स्वप्ने स्वतः सोबत त्यांच्याही मनात जागविणारा, रयतेचा प्रेमळ, कनवाळू आणि आपल्या सर्वांचा लाडका शिवबा या दिवशी ‘श्रीमान श्रीमंत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज’ झाले होते.

शिवराज्याभिषेकाची गरज का होती ? त्याचे काय परिणाम झाले ?
                             हेन्री हा इंग्रज अधिकारी आपल्या डायरीत नमूद करतो कि, “मी पाहतोय राजे आपल्या भव्य सिंहासनावर आरूढ झाले होते. त्यांच्याजवळ मूल्यवान पोशाख केलेले संभाजीराजे, पेशवा, प्रधान व अनेक ब्राह्मण उभे होते. आम्ही (हेन्री यांनी) आणलेला नजराणा देण्यासाठी नारोजी पंडितांनी आम्हाला पुढे केले व शिवरायांनी आम्हाला सिंहासनाच्या पायरीशी येण्याचा हुकूम केला आणि आम्ही जाताच आम्हाला पोशाख देऊन रजा दिली.

त्या सिंहासनावरील खांबांवर मुसलमान पद्धतीची अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे आम्ही पहिली. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत एक सोन्याच्या तराजूची परडी न्यायचिन्ह म्हणून शोभत होती. गडावरील राजवाड्याच्या बाहेर आम्ही पाहतो तर दोन हत्ती उभे केले होते आणि दोन पांढरे शुभ्र घोडे देखील उभे होते. गडाची वाट इतकी बिकट असतांना हे हत्तीसारखे विशाल प्राणी गडावर कसे आणले असावेत हा प्रश्न आम्हाला पडला आहे.”         
   
   🚩 हर हर महादेव....! 🚩   

Saturday, 23 May 2020

वार्षिक परीक्षा निकाल( इयत्ता तिसरी ) - सन 2019-20

निकाल पाहण्यासाठी खालील निकालावर 
क्लिक करा.

वार्षिक परीक्षा निकाल( इयत्ता तिसरी ) - सन 2019-20


                 



Thursday, 21 May 2020

वर्गवाटप 2020-2021

अ. 
क्र.
शिक्षकाचे  नाव    इयत्ता        विषय  
वार्षिक 
 नियोजन  
    1.
सौ. पौर्णिमा चव्हाण.
 पहिली सर्वDOWNLOAD
    2.
सौ. कविता  अनंत.
दुसरी सर्वDOWNLOAD 
    3.
श्री. शरदकुमार खांडेकर.
तिसरी सर्वDOWNLOAD
    4.
श्री. सोमेश्वर भगवान.
चौथी सर्वDOWNLOAD
    5.
श्री. दिलीप मुजुमले.
पाचवी  सर्वDOWNLOAD
    6.
सौ. कविता  शिंदे.
सहावी सर्वDOWNLOAD
    7.
सौ. मंदाकिनी तासगावकर.        
सातवी     सर्व      DOWNLOAD   

Sunday, 17 May 2020

शाळा प्रवेश 2020-21


 
🌼 प्रवेश!प्रवेश!प्रवेश!* 🌼
  
📢📢📢📢
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुसगाव 
 केंद्र - शिवरे ता.भोर,  जि.पुणे
 सेमी इंग्रजी डिजीटल स्कूल 
 इयत्ता पहिली ते सातवी 
🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀
       सन २०२०-२१
आजच आपला प्रवेश निश्चित करा
🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂
प्रवेशासाठी पूढील लिंकवर 
क्लिक करा आणि माहिती भरा.
👇👇👇👇👇


✒✒✒📒📒📒✒✒✒
    शाळेची वैशिष्ट्ये
    🇮🇳🏆🏆🏆🏆🇮🇳
  • 🏵  १००% प्रगत शाळा* 
  •  💥 शाळा सिद्दी अ + श्रेणी 
  •  💻  स्मार्ट टी.व्ही. वापर 
  • 🖥️  डिजीटल क्लासरुम 
  •  📟  अध्यापनात प्रोजेक्टर मार्फत ई- लर्निंग सुविधा 
  • 📸 सी. सी .टी.व्ही कॅमेरा नियंत्रित शाळा 
  • 📝 1 ली ते 7 वी सेमी इंग्रजी अध्यापन 
  • 🎳   ज्ञानरचनावाद  
  • 🎁  सावित्रीबाई फुले/उपस्थिती भत्ता 
  • 🎲♟ बुद्धिबळ प्रशिक्षण 
  • 🤼‍♀ स्काऊट-गाईड प्रशिक्षण 
  • 📚  ग्रंथालय सुविधा
  • 🧮 शैक्षणिक साहित्य
  •  🥁 सांस्कृतिक कार्यक्रम 
  • 🎼  संगणक प्रशिक्षण 
  • 🧠 ब्रेन ट्रेनिंग गेम्स
  • 👩🏻‍🏫 प्रशिक्षीत शिक्षक वर्ग
  • 🦽 अपंग समा.शिक्षण
  • 👔 मोफत गणवेश
  •  🔏 मोफत लेखन साहित्य 
  • 🥬🥦 परसबाग
  • 🍽️ शालेय पोषण आहार
  • ⛳ खेळासाठी भव्य क्रिडांगण
  • 🏸 सर्व क्रिडा साहित्य
  •  🎷 आकर्षक लेझीम पथक 
  • 🔬 नाविण्यपूर्ण प्रयोगशाळ  साहित्य 
  • 🚽 शौचालय सुविधा 
  • 🚑  मेडिकल    चेकअप 
  • 🏝   सुंदर रंगरंगोटी 
  • 📬   सुचना  पेटी         
🌸🌸🍁☘☘☘🍁🌸🌸
      *प्रवेशासाठी संपर्क साधावा  
📌📌📌📌
सौजन्य
🚩 व्यवस्थापन समिती, कुसगाव. 💐
 📌📌📌📌📌
          मुख्याध्यापिका
    सौ. मंदाकिनी तासगावकर
   शिक्षकवृंद 
१) सौ. कविता शिंदे.
२)श्री. भगवान सोमेश्वर.
३) श्री. मुजुमले दिलीप.
४) सौ. चव्हाण पौर्णिमा.
५) सौ. अनंत कविता.
६) श्री. खांडेकर शरद.
*🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
School email: kusgaon.school123@gmail.com
🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄
 श्री. सोमेश्वर रमेश भगवान. 
९८२३२६३३८४ 
🥎🥎🥎🥎🥎🥎🥎🥎🥎
   🙏Created By👍

Friday, 8 May 2020

नामांकित न्युजपेपर हिंदुस्तान टाईम्सने घेतली कोविड-19 विरुध्दच्या लढाईत "शिक्षक (कोरोना योध्दा) योगदानाची" दखल..

नामांकित न्युजपेपर हिंदुस्तान टाईम्सने घेतली कोविड-19 विरुध्दच्या लढाईत "शिक्षक (कोरोना योध्दा) योगदानाची" दखल.



 In Hindustan Times Newspaper:-
Today's news.
"Primary school teachers man police check-posts in rural Pune"
08/05/2020


(In pic) Teachers on duty at Kusgaon in Bhor taluka. According to Sudam Ombale, Bhor taluka teachers association president, 335 teachers have been appointed on check-post duty. ht PHOTO
Abhay Khairnar

abhay.khairnar@htlive.com


PUNE : Someshwar Bhagwan and Appa Sawant are primary school teachers in government schools. However, in these times of Covid-19 and the lockdown, they are required to keep awake the entire night for their duty at the police check-post (naka bandi) in Bhor taluka.

In view of the shortfall in police manpower, primary teachers have been appointed for bandobast duty in many parts of rural Pune.

Sudam Ombale, the Bhor taluka teachers association president, said, “Around 335 teachers have been appointed on check-post duty and a total of 32 check-posts have been erected on roads in Bhor taluka. We are receiving good support from officials, but it is a fact that in remote areas, people are facing some problems. Teachers did not get safety equipment and on their own have been purchasing sanitisers and masks. At some places, there is the issue of safety at night.” Vishal Tanpure, block development officer (BDO) from Bhor, said, “It is true that teachers have been assigned the role of policing. As there is limited manpower with the police, we have decided to depute teachers and this practice is being followed all over Maharashtra. Earlier, we tried to give support of the home guards to teachers, but home guards too have less manpower and now only teachers are doing the policing work. As Bhor is close to Pune, due to the Covid-19 pandemic, there is huge reverse migration and a total of 22,000 people from Mumbai and Pune returned to Bhor taluka as cases increased in both the cities.”

Bhagwan who has been appointed at Kusgaon in Bhor taluka of Pune district, said, “This is a totally different experience for us. We have done census enumeration work and we have been on election duty and other kinds of work. But this is the first time that we are doing the work of policemen and that too on night duty.” Bhagwan, who has been given the responsibility of the check-post in Kusgaon, said, “The locals follow the instructions, but outsiders get into arguments and try to clear the check-post without a valid pass. Some of them argue with us saying we have no authority to stop them as we are not policemen.”

The teachers work in three shifts and every teacher has to do night duty by rotation. Two of them stay awake the entire night to man the check-posts.

“We have managed the chairs and the bamboos on our own to barricade the road. We enter the number of each vehicle passing by this road in a register and check whether they have a valid pass or not,” Bhagwan said.

Appa sawant, a teacher from Bhor taluka, said he has done night patrolling and survey and supervision of people during the quarantine.This is a completely different kind of work. The government should ideally put revenue staff like talathi or people from some other department with authority along with us teachers as people don’t listen to us,” Sawant said. “To put teachers on road duty is not right,” he said, while adding that there were no complaints about this given the extraordinary circumstances caused by the coronavirus pandemic. Check-post is absolutely bare with basic provisions and the villagers are also not assisting in any way, a teacher said.

© 2020 All Rights Reserved. Powered by Summit

[12:14, 08/05/2020]
 SOMESHWAR RAMESH BHAGAWAN: 🙏

Thursday, 7 May 2020



----------🚩--–-------
।। *अशी ही शिवजयंती !* ।।

अखंड महाराष्ट्राचे दैवत
सह्याद्रीचा स्वाभिमान
प्रौढप्रतापपुरंदर
स्वराज्यसंस्थापक
छत्रपती
*शिवाजी महाराज*
यांची
आगळी-वेगळी
विद्यार्थीपेरणादायी व समाजप्रेरक,आदर्श स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी, *सिंहगडावर तानाजी महाराजांच्या साक्षीने ज्योत प्रज्वलित करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव पर्यंत मुलं व मुली यांच्या हस्ते ज्योत धावत* आणून समाजाला नवा आदर्श घालून दिला .
लोककल्याणकारी स्त्री-पुरूष समानता प्रस्थापित करणारी शिवजयंती साजरी करण्यात आली......!* 💐🙏
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
🚩 *जय भवानी,जय शिवाजी* 🚩

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव , विद्यार्थीसंघ*
नियोजन खालीलप्रमाणे होते:-

१) पहाटे ५:३० ला शाळेत जमा होणे.
२) सकाळी ६:०० वाजता सिंहगडाकडे रवाना.
३) सकाळी ६:४५ वाटते सिंहगडावर पोहचल्यावर ८:०० वाजेपर्यंत किल्ला पाहणे.
४) तानाजी महाराजांच्या समाधी जवळ ज्योत प्रज्वलित करून मुल व मुली एकत्र धावत स.१०:०० वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव येथे पोहचणे.
५) शिवजयंती उत्साहात शाळेत नियोजित कार्यक्रमानुसार साजरी करणे.
🚩🚩 *"हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय."*🚩🚩

ही आवडते मज मनापासुनी शाळा.....!


शाळा 

ही आवडते मज मनापासुनी शाळा |
लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी |
आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ! |
हातांत घालुनी हात तयांच्या राहू |
येथेच बंधुप्रेमाचे, घ्या धडे |
मग देशकार्य करण्याला, व्हा खडे ||
पसरवा नाव शाळेचे, चहूकडे |
मग लोक बोलतील "धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करिते बाळा !" ||
लाविते लळा ही, जसा माउली बाळा |
मज आवडते मनापासुनी शाळा ||
प्र. के. अत्रे (केशवकुमार)