सुस्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव....! या ब्लॉगवरील माहिती अपडेट करणे चालू आहे.

शाळा

शाळा 

बालभारती कविता : माझी शाळा
ही आवडते मज मनापासुनी शाळा |
लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||

हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी |
आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||

हे प्रेम कराया किती भोवती भाऊ! |
हातांत घालुनी हात तयांच्या राहू |
येथेच बंधुप्रेमाचे, घ्या धडे |
मग देशकार्य करण्याला, व्हा खडे ||

पसरवा नाव शाळेचे, चहूकडे |
मग लोक बोलतील "धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करिते बाळा !" ||
लाविते लळा ही, जसा माउली बाळा |
मज आवडते मनापासुनी शाळा ||

प्र. के. अत्रे (केशवकुमार)

No comments:

Post a Comment

धन्यवाद.....!